Chh. Sambhajinagar जि. प. निवडणुकीत 'म्हैसूर शाई'चा वापर,पालिका निवडणुकीत झालेल्या गोंधळानंतर निर्णय

छत्रपती संभाजीनगर येथे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये लोकसभा व विधानसभा निवडणुकीप्रमाणे ‘म्हैसूर शाई’चा वापर करण्यात येणार आहे. यापूर्वी २०१० पासून मतदानासाठी मार्कर पेनची शाई वापरली जात होती. विभागीय स्तरावरील आढावा बैठकीत निवडणूक तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.....मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी मतदार जनजागृती उपक्रम प्रभावीपणे राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या. ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला व दिव्यांग मतदारांसाठी विशेष सुविधा, दुबार मतदारांकडून संमतीपत्रे, पुरेशी मतदान केंद्रे, ईव्हीएमची उपलब्धता, अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, स्ट्रॉगरूम सुरक्षा आणि संवेदनशील केंद्रांवर कडक बंदोबस्ताची तयारी पूर्ण असल्याची माहिती देण्यात आली.

संबंधित व्हिडीओ