मुंबईत भाजपकडून जनआक्रोश मोर्चा काढण्यात आलाय.महिला आरक्षण सुधारणा विधेयक मंजूर न झाल्याने काँग्रेससह विरोधकांविरोधात हा मोर्चा काढण्यात आला होता, पण यापेक्षा हा मोर्चा वाहतूक कोंडीमुळे जास्त चर्चेत आला, यावेळी मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत एका महिलेनं या वाहतूक कोंडीवर आक्रमक होत वाद घातला, वरळीच्या जांबोरी परिसरात हा मोर्चा होता, ऐन वाहतुकीच्या वेळी मोर्चा निघाल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली.आणि यामुळेच संतापलेल्या महिलेने थेट मंत्र्यानाच धारेवर पकडलं...दरम्यान यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टीका केलीय