Nepal ला पळून चाललेल्या आरोपीला कात्रजमधून अटक, 6 तासांत खूनप्रकरणाचा उलगडा | Crime News

पुण्याच्या भोर तालुक्यातील जांभळी येथे वृद्धाचा निर्घृण खून झाल्याची घटना घडलीय. किसन सुर्वे असं या वृद्धाचं नाव आहे. सुर्वे हे त्यांचा जावई अनिल रसाळ यांचे हॉटेल चालवायचे.दरम्यान जावयाच्या हॉटेलमधीलचं एका आचाऱ्याने किरकोळ कारणावरून हा खून केलाय. खूनप्रकरणाचा भोरमधील राजगड पोलिसांनी अवघ्या 6 तासांत उलगडा केलाय पोलिसांनी दोन विशेष पथके तपासासाठी तात्काळ रवाना करून अचूक सापळा रचत आरोपी नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला पुण्यातील कात्रज चौकातून ताब्यात घेतलेय.

संबंधित व्हिडीओ