पश्चिम आशियातील युद्धाचा फटका दक्षिण आशियात जाणवू लागला आहे. फिलीपिन्समध्ये सरकारनं ऊर्जा आणीबाणी जाहीर केली आहे. तिथं पेट्रोल आणि डिझेल तुटवडा जाणवू लागल्यानं खबरदारी म्हणून सरकारनं ऊर्जा आणीबाणी जाहीर केली आहे. अशाप्रकारची ऊर्जा आणीबाणी जाहीर करणारा फिलिपीन्स हा पहिला देश ठरला आहे, खऱंतर संपूर्ण आशियामध्ये पेट्रोल आणि डिझेल तुटवडा जाणवू लागला आहे. मात्र फिलीपिन्सनं सर्वात आधी खबरदारीच्या योजना आखण्यास सुरुवात केली आहे. पाहूया फिलीपिन्समध्ये नेमकी काय परिस्थिती उद्भवू लागली आहे.