पश्चिम आशियात सध्या तणावाची भीषण स्थिती निर्माण झाली असून इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यात तुफान संघर्ष पेटला आहे. तिन्ही देशांकडून क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांची मालिका सुरू असून परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच चिघळताना दिसत आहे. दरम्यान, अमेरिकेकडून काही निर्बंध शिथिल करण्याचे संकेत देत युद्ध थांबवण्याचा प्रयत्न केला जात असला, तरी इराणकडून हल्ल्यांची तीव्रता वाढवण्यात आली आहे. मात्र आता अमेरिकेकडून इराणभोवती वेढा अधिक घट्ट करण्यात येतोय. तो कसा? आणि ट्रम्प यांची नवी खेळी काय आहे पाहूया..