नाशिकचा आरोपी कॅप्टन अशोक खरात आणि त्याच्या साम्राज्याचे धक्कादायक पैलू एकामागून एक समोर येत आहेत… केवळ अंधश्रद्धा आणि फसवणूकच नाही, तर स्थानिक पातळीवर दहशत निर्माण करून सामान्य नागरिकांना वेठीस धरण्याचे प्रकारही उघड होत आहेत… कोपरगाव तालुक्यातील मढी येथे खरातच्या निकटवर्तीय हस्तकांनी खरातच्या राजकीय प्रभावाचा वापर करत शेतकरी नारायण आभाळे यांचा शेताकडे जाणारा वहीवाटीचा रस्ता अडवल्याचा गंभीर आरोप समोर आलाय… परिणामी, गेल्या तब्बल दोन वर्षांपासून त्या शेतकऱ्याची ऊसतोडच होऊ शकलेली नाही. नेमका हा संपूर्ण प्रकार काय आहे, याचसंदर्भातील सुनिल दवगेंचा खास रिपोर्ट पाहुयात.