अशोक खरातच्या कारनाम्यांमुळे राजकारण ढवळून निघालंय.. त्यातच आता शीतल म्हात्रे विरुद्ध सुषमा अंधारे यांच्यात वाकयुद्ध रंगलंय.. अशोक खरातच्या शिवनिका संस्थेला महाविकास आघाडी सरकारच्या काळात पाणीपुरवठा करण्यात आला होता. याची तार शीतल म्हात्रे यांनी 'मातोश्री' सोबत जोडलीय. मातोश्रीवरील मॅडमच्या सांगण्यावरून पाणी पुरवठा करण्यात आला असा गंभीर आरोप शीतल म्हात्रेंनी आपल्या ट्विटमधून केलाय. तर सुषमा अंधारेंनी याला उत्तर देताना प्रकाश सुर्वे आणि शीतल म्हात्रे यांच्या रॅलीतल्या व्हिडीओचं प्रकरण उकरून काढलंय.. दोन्ही शिवसेनेच्या या दोन महिला नेत्यांमध्ये सुरू असलेलं ट्विटर वॉर पाहुआत..