अभिनेते Kishor Kadam यांचं मुंबईतील घर धोक्यात, मुख्यमंत्र्यांना टॅग करत पोस्ट; नेमकं प्रकरण काय?

कवी सौमित्र उर्फ किशोर कदमांचं मुंबईतील घर धोक्यात आलंय. फेसबूकपोस्ट करत किशोर कदम यांनीच ही माहिती दिलीय. आपण राहत असलेल्या अंधेरी पुर्वेतल्या चकाला परिसरातील सोसायटीचा पुनर्विकास केला जातोय. पण बहुमताच्या नावाखाली प्रोजेक्ट मॅनेजमेंट कंपनी आणि बिल्डर यांनी संगनमताने सोसायटीच्या कमिटी सभासदांची दिशाभूल करून प्रचंड गोंधळ सरू असल्याचं कदम यांचं म्हणणं आहे. या गोंधळामुळे आपल्यासह इतर २३ सभासदांची राहती घरं धोक्यात आल्याचा कदम यांचा आरोप आहे. अर्धवट माहिती, आणि लपवाछपवी केल्याचा आरोप करत अभिनेते किशोर कदम यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना टॅग करत मदतीची साद घातलीय.

संबंधित व्हिडीओ