ऑपरेशन सिंदूरमध्ये जोरदार मार खाल्यानं पाकिस्तानी लष्कर चांगलंच घायाळ झालंय. तीन महिने झाले तरी भारतीय लष्करानं पाकिस्तानला दिलेल्या जखमांचे घाव अद्यापही भरलेले नाहीत. त्याच जखमांच्या वेदनेतून पाकिस्तानचे लष्कर प्रमुखांनी पुन्हा एकदा अण्वस्त्रांची धमकी दिलीय.. आम्ही बुडतोय असं वाटत असेल, तर आम्ही अर्ध जग घेऊन बुडू असं आसीम मुनीर यांनी म्हटलंय. अमेरिकेच्या धर्तीवरुन करण्यात आलेल्या दर्पोक्तीला भारतानंही चोख उत्तर दिलंय.