दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातल्या वाढत्या भटक्या कुत्र्यांचा त्रासाविषयी आज सर्वोच्च न्यायालयानं एका ऐतिहासिक निकाल दिलाय. दिल्लीतील सगळे भटके कुत्रे पकडा आणि एकत्र करुन एका निवारा केंद्रात नेऊन सोडण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयनं दिले आहेत. जर कुणी या कामात अडथळे आणले, तर त्यांच्याविरोधात कोर्टाच्या अवमानानेची कारवाई करण्यात येईल असा स्पष्ट इशारा सर्वोच्च न्यायालयानं दिलाय. न्यायमूर्ती पारडीवाला यांनी श्वानप्रेमीविषयी बोलताना ज्या लहान मुलांना रेबीज झालाय अशा लहान मुलांना तुम्ही परत आणू शकणार आहात का असा प्रश्नही निकाल देते वेळी विचाराला. या निकालाची देशभरात जोरदार चर्चा सुरु आहे. दरम्यान प्राणी प्रेमी म्हणून देशात प्रसिद्ध असणाऱ्या भाजपच्या माजी खासदार मनेका गांधींनी या निर्णयाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केलीय .