राहुल गांधींच्या निवडणूक आयोगावरील आरोपांनंतर आता उद्धव ठाकरे आणि फडणवीसांमध्ये जुंपलीय. देवेंद्र फडणवीस हे चोरांचे सरदार असल्याचा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केलाय.. त्याचबरोबर त्यांनी मतांची चोरी केल्याचंही ठाकरेंनी म्हटलंय.. त्यावरून आता फडणवीसांनी पलटवार केलाय. उद्धव ठाकरे जनादेश चोर आहेत म्हणून त्यांना जनतेनं घरी बसवलं अशा शब्दात फडणवीसांनी पलटवार केलाय.