लातूरमध्ये दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याचं आज अनावरण झालंय. या कार्यक्रमातील भाषणावेळी भाजप आमदार रमेश कराड यांची जीभ घसरलीय. माझा मतदारसंघ म्हणजे पाकिस्तानमध्ये भारताचा झेंडा लावण्यासारखं आहे. आमच्या मतदारसंघात सतरंजीसुद्धा मिळत नव्हती, सभेला माणूस येत नव्हता असं वक्तव्य करत रमेश कराड यांनी नाव न घेता काँग्रसे नेते धीरज देशमुख यांच्यावर टीका केलीय.