"महाराष्ट्रातला सर्वांत मोठा पक्ष हे भाजपला मिळालेलं स्थान आणि त्याचा पाया गोपीनाथ मुंडेंनी रचला,' अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिवंगत गोपिनाथ मुंडेंच्या कार्याची प्रशंसा केली. लातूरमध्ये आज भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याचं अनावरण पार पडलं त्यावेळी ते बोलत होते. गोपीनाथ मुंडे यांनी विविध यात्रांच्या माध्यमातून सर्वसामान्यांचा संघर्ष उभा केल्याचंही फडणवीस म्हणालेत.. या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह अनेक भाजपचे नेते उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषण करत गोपीनाथ मुंडेंच्या आठवणी सांगितल्यात..पाहुयात