बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड सध्या नाराज असल्याची चर्चा आहे.या चर्चेला कारण ठरलाय तो चिखलीतील गायकवाड यांनी लावलेला एक बॅनर.चिखली येथील पक्षाच्या संवाद बैठकीत लावलेल्या बॅनरवर फक्त गायकवाडांसह केवळ त्यांच्याच मुलाचा फोटो आहे. या बॅनरवरून एकनाथ शिंदे यांचा फोटो गायब झालाय. बॅनरवर पक्षाचं नाव किंवा पक्षाचं चिन्हही दिसून आलेलं नाही.बैठकीतील बॅनरवरून विविध चर्चा रंगल्यात.यावर गायकवाड यांनी उत्तर देण्यास सरळ-सरळ टाळाटाळ केली.दरम्यान संजय गायकवाड यांनी हे दाखवून दिले की ते शिंदेंनाही मानत नाही अशी टीका किशोरी पेडणेकर यांनी केलीये...