चीन अमेरिका यांच्यातील व्यापार युद्ध स्थगित होऊन उद्या म्हणजे 12 ऑगस्टला 90 दिवस पूर्ण होणार आहेत. चार महिन्यापूर्वी अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापार युद्ध सर्वोच्च पातळीवर असताना अमेरिकेनं चीनवर 250 टक्के तर चीननं अमेरिकेवर 145 टक्के कर लावला होता. दोन्ही देशातला व्यापार जवळपास ठप्प झाला होता. ही कोंडी फार काळ टिकणं दोन्ही देशांसाठी आणि जागतिक अर्थव्यवस्थेसाठी चांगलं नव्हती. जगातले शेअर बाजार, अमेरिकेतला बाँड बाजार, अमेरिकन डॉलरचा भाव पडू लागला. आणि टेरिफचा फटका चीन पेक्षा अमेरिकेलाच बसतोय असं लक्षात आल्यावर ट्रम्प प्रशासननं चीनशी हातमिळवणी केली आणि व्यापार युद्धाला ब्रेक लागला. पण आता करांना दिलेली स्थगितीची मुदत संपणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा व्यापार युद्धाचे ढग गडद होतायत. पण अमेरिकेनं यंदा 48 तास आधीच कच खाल्लीय...