सोलापुरात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढलाय.पाऊस असाच सुरु राहिला तर पुन्हा एकदा सीना पात्राबाहेर पडण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वी याच सीनेचं पाणी लव्हे गावात शिरलं आणि एका समृद्ध गावाची समृद्धी एकाएकी गेली. आयडीबीआय बँक पाण्याखाली गेल्याचं दृश्य तुम्हाला एनडीटीव्ही मराठीनं दाखवलेलं होतं. त्याच आयडीबीआय बँकेबाहेर सध्याची काय स्थिती आहे? पावसाचा जोर कसा वाढलाय.. आणि घरांमध्ये शिरलेल्या पाण्यात विषारी साप फिरत असल्यानं गावकऱ्यांना कसा सामना करावा लागतोय.. याबाबत आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी..