अहिल्यानगर महापालिकेचे कर्मचारी धीरज परदेशी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर शहरात संतापाची लाट उसळली आहे. सकल हिंदू समाज आणि हिंदू कार्यकर्त्यांनी शहरातील दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले असून, कापड बाजार, चितळे रोड आणि नवी पेठ परिसरात फिरून व्यापाऱ्यांशी संपर्क साधला जात आहे. या घडामोडींमुळे शहरातील वातावरण तापले असून पोलिस प्रशासनही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.