मुंबईच्या मालाडमधून एक धक्कादायक बातमी समोर आलीय.. मालाडमध्ये भाजप नेत्यांच्या उपस्थितीत मराठी न बोलता येणाऱ्या चालकांना मराठी भाषेची परीक्षेची प्रमाणपत्र वाटण्यात आली आहेत. आधी अमराठी रिक्षा चालकांना मराठी सक्तीची भूमिका घेणारं.. राज्य सरकार आता नरमाईची भूमिका घेताना दिसतंय.. भाजपने तर एक पाऊल पुढे जात मराठी न बोलता येणाऱ्या चालकांनाही प्रमाणपत्र वाटली आहेत. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या नेतृत्वात आज मराठी भाषा परीक्षा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी हिंदीतून भाषणही केलं आणि प्रमाणपत्रही वाटली. एकीकडे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक मराठी सक्तीची भाषा करतात. दुसरीकडे त्यांच्या सरकारमधील मराठी नेतेच प्रमाणपत्रांची उधळण करताना दिसत आहेत.
Malad BJP issues certificates to non-Marathi-speaking auto-rickshaw drivers; event held in the presence of Amit Satam