PM Modi यांच्या हाकेला Ahilyanagar चा प्रतिसाद; जिल्हाधिकारी कार्यालयात 'No Vehicle Day'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत, अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आज 'हरित शुक्रवार, नो व्हेईकल डे' उपक्रम पाळला. या अंतर्गत बहुतांश कर्मचाऱ्यांनी पेट्रोल आणि डिझेल वाहनांचा वापर पूर्णपणे टाळला. निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते आणि जिल्हाधिकाऱ्यांचे स्वीय सहाय्यक स्वतः निवासस्थानापासून सायकल चालवत कार्यालयात दाखल झाले. तर अन्य कर्मचाऱ्यांनी पायी, सायकल, इलेक्ट्रिक वाहने, शेअरिंग आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा पर्याय निवडला. या प्रदूषण नियंत्रण आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला.

संबंधित व्हिडीओ