राज्यातील इंधन टंचाईवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. पेट्रोल आणि डिझेलबाबत काही ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य केले आहे. त्याचवेळी नागरिकांनी घाबरून इंधनाची साठेबाजी करू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.