पुण्याच्या भोर तालुक्यात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह मान्सून पूर्व पावसाची जोरदार हजेरी.भोर तालुक्यातील अनेक ठिकाणी कोसळल्या मान्सूनपूर्व पावसाच्या सरी.अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ. पावसाच्या हजेरीने उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालायं..तर पाऊस सुरु झाल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरणयं. मागील दोन दिवसांपासून वातावरणात प्रचंड बदल झाला होता. ढगाळ वातावरण आणि उकाडा कायम असताना पावसाने हजेरी लावल्यानं,हवेत गारवा निर्माण झालायं..