सतत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांना पुन्हा घरचा आहेर.शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री संजय शिरसाट यांना कडक शब्दात झापले.महायुतीमध्ये मीठाचा खडा पडेल असे वक्तव्यं करू नका.महायुती अभेद्य आहे… तीला गालबोट लागेल असे वक्तव्यं कुणीही करु नये.शिवसेना मंत्री संजय शिरसाट यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज.मंत्री संजय शिरसाट यांनी राष्ट्रवादी कॅाग्रेसमधील काही नेते शिवसेनेच्या संपर्कात असल्याचं वक्तव्यं केले होते… त्यामुळे राष्ट्रवादी कॅाग्रेसचे नेते नाराज झाले होते… त्यांनी त्यांची नाराजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे फोनवरून व्यक्त देखील केली आहे.