Bandra Demolition| वांद्र्यातील अतिक्रमणावर आजही हातोडा; तर पोलिसांवर सिमेंट ब्लॉक फेकणाऱ्याला अटक

वांद्रे पूर्व आणि पश्चिम परिसरातील अनधिकृत बांधकामांवर मुंबई महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेली ही मोहीम आज चौथ्या दिवशीही सुरूच आहे. जेसीबी आणि कामगारांच्या मदतीने फुटपाथवरील टपऱ्या, अनधिकृत गाळे आणि वाढीव बांधकामे जमीनदोस्त केली जात आहेत. कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वांद्रे पोलिसांसह दंगल नियंत्रण पथकही घटनास्थळी उपस्थित आहे. अतिक्रमणधारकांचा विरोध होऊ नये यासाठी महापालिका आणि पोलिस प्रशासन सतर्क आहे.

संबंधित व्हिडीओ