- पुण्याच्या भोर तालुक्यात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह मान्सून पूर्व पावसाने जोरदार हजेरी लावलीय.भोर तालुक्यातील अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्यात.. अचानक आलेल्या पावसानं मात्र नागरिकांची चांगलीच तारांबळ उ़डालीय.. पावसाच्या हजेरीने उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय.. तर पाऊस सुरु झाल्याने शेतकरी वर्गात समाधानाचं वातावरण आहे.पुण्याच्या कोंढवा, सिंहगड रोड, आंबेगाव आणि कात्रज परिसरात हलक्या पावसाने हजेरी लावली.. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळालाय.. भारतीय हवामान विभागाने आज हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला होता..त्यानुसार आता पावसाने पुण्यात हजेरी लावलीय.. पुणे शहरातील अनेक भागांत मेघगर्जनेसह जोरदार पावसाने हजेरी लावलीय. कोंढवा, हडपसर, लष्कर, येरवडा, विमाननगर, शिवाजीनगर परिसरात जोरदार पाऊस झालाय. तसंच एरंडवणे, सदाशिव पेठ, नारायण पेठ, कसबा पेठ आणि शुक्रवार पेठ भागातही मुसळधार सरी कोसळल्यात.