प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे.इतकंच नाही तर ते थांबलेल्या हॉटेलमध्ये दोन अज्ञात व्यक्तींनी शिरण्याचा प्रयत्न केला.या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान हॉटेलमध्ये शिरण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांची ओळख पटली आहे.गणेश उगले आणि योगेश शेळके अशी या दोघांची नावे आहेत. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याने राजकीय वातावरण तापले आहे. पोलिस तपासातून पुढे काय माहिती समोर येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. प्रसाद लाड यांच्यावरील हल्ल्याच्या प्रयत्नावर मनोज जरांगेंनी भूमीका जाहीर केलीय....ते काय म्हणालेत पाहुयात....