प्रचारसभेत पक्षाच्या गमछावरून अजित पवारांनी जिल्हाध्यक्ष उमेश पाटलांना फटकारलंय.कुर्डूवाडी नगरपालिकेच्या प्रचार सभेमध्ये अजित पवारांनी थेट जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनाच फटकारलंय.. सभा सुरू होत असतानाच उमेश पाटलांनी राष्ट्रवादीचा गमछा अजित पवारांच्या अंगावर टाकण्याचा प्रयत्न केला.त्यावरून अजित पवारांनी फटकारलं.. मी पस्तीस वर्षे कष्ट करुन इथपर्यंत आलोय.. मी घड्याळ लावून फिरतोय.. असं अजित पवारांनी म्हटलंय. अरे हा राष्ट्रवादीचाच गमछा आहे... अस मी काही बोललो..तर टिव्हीला दाखवतेते दादाने अपमान केला. अरे पस्तीस वर्षे मी घासून इथ आलो. आणि हा गमजा टाकतोय मला. हे बघ मी घड्याळ लावून फिरतोय. असे सांगत अजित पवार यांनी जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांना फटकारले.