इंडोनेशियावर निसर्गानं जणू प्रकोपच केलाय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या आठवड्यात इंडोनेशियातील जावावरील सेमेरूमधून मोठ्या प्रमाणात राख बाहेर पडली. पाऊस तर तिथं आधीपासूनच सुरु आहे. याच पावसामुळे आता तिथं मोठा पूर आलाय. सुमात्राला या पुराचा सर्वाधिक फटका बसलाय. ते कमी की काय तर सुमात्रामध्येच भूकंपाचा धक्का ही बसलाय. तर इंडोनेशियातील जावामध्ये आणखी एक ज्वालामुखी, माऊंट मेरापीही सक्रीय झालाय. एकूणच आभाळही फाटलं आणि धरणीही हादरली... या नैसर्गिक आपत्तींमुळे इंडोनेशियामध्ये नेमकी कशी स्थिती आहे. पाहूया...