- जगात कुठे ना कुठे सक्रीय ज्वालामुखींचे स्फोट होतच असतात. मात्र २३ नोव्हेंबरला जो स्फोट झाला त्यानं जगाची चिंता वाढवली. अनेक भूगर्भीय अभ्यासकांनीही ही घटना गंभीर असल्याचं म्हटलं, कारण सुमारे १२ हजार वर्षांत जे झालं नाही ते २३ नोव्हेंबरला घडलं. इथिओपियाच्या हेली गुब्बी ज्वालामुखीतून १४ किमीपर्यंत राख वर उडाली आणि त्याचा परिणाम थेट चीनपर्यंत जाणवला. त्याची पुन्हा पुन्हा चर्चा करण्याचं कारण म्हणजे बाबा वेंगा. विसाव्या शतकातील या भविष्यवेत्तीनं काही भाकितं केली होती आणि त्यांचे समर्थक त्यांच्या या भाकितांचा सध्या घडत असलेल्या घटनांशी संबंध जोडत आहेत. इथिओपियाच्या ज्वालामुखीबाबतही बाबा वेंगांनी भाकित करून ठेवलं होतं असा दावा केला जातोय. नेमकी काय भविष्यवाणी केली होती, त्याला काय पुरावे आहेत, अभ्यासकांच यावर काय मत आहे. पाहूया सविस्तर रिपोर्ट....