मला दोन डिसेंबरपर्यंत युती टिकवायची आहे, असं सूचक विधान भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलंय... एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते निलेश राणेंनी भाजपाकडून पैसे वाटले जात आहेत, असा खळबळजनक आरोप केला.. या सर्व आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी मोठं वक्तव्य केलंय.. त्यांच्या या विधानानंतर महायुतीत लवकरच काहीतरी घडणार का? असा सवाल विचारला जातोय... जळगावध्ये ते महायुतीच्या उमेदवारांचा जोमात प्रचार करत आहेत. त्यांच्या याच दौऱ्यावेळी निलेश राणे यांनी केलेल्या आरोपांबाबत प्रश्न विचारला... यावर बोलताना मात्र रवींद्र चव्हाण यांनी मोठे सूचक विधान केलंय... मला दोन डिसेंबरपर्यंत युती टिकवायची आहे.. त्यामुळे मी यावर काहीही बोलणार नाही.. मी नंतर यावर भाष्य करेन, असं थेट आणि मोठं विधान रवींद्र चव्हाण यांनी केलं.. त्यामुळे दोन डिसेंबरनंतर युती टिकणार की तुटणार असा सवाल उपस्थित केला जातोय..