उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आता फोनवरून एमआयडीसी वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला की काय अशी चर्चा आता रंगलीय.. त्याचं कारण म्हणजे शिंदेंनी भरसभेतून उद्योग मंत्री उदय सामंतांना फोन लावत यवतमाळमध्ये एमआयडीसी निर्माण करण्याबाबत चर्चा केलीय.. त्याचबरोबर मतदारांना शब्द देऊ का? अशी विचारणाही त्यांनी सामंतांना केलीय.. त्यावर सामंतांनी आश्वासन देण्यासाठी होकार दिला आणि शिंदेंनी मतदारांना औद्योगिक वसाहत निर्माण करण्याबाबत ठोस आश्वासन दिलं.. यवतमाळच्या पांढरकवडा इथल्या सभेत हा प्रकार समोर आला... पण हा एकमेव प्रकार नाही तर एकनाथ शिंदेंनी वाशिम दौऱ्यातही हेच केलं.. वाशिमच्या मालेगावमध्ये भरसभेतून शिंदेंनी पुन्हा उद्योग मंत्र्यांना फोन करत MIDC च्या प्रश्नांवर चर्चा केली.. त्याचबरोबर संबंधित अधिकाऱ्यांना विकासकामांचा पाठपुरावा करण्याचं आणि तातडीने निर्णय घेण्याचे देण्याचं सामंतांना सांगितलं...