पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावरून सध्या पाकिस्तानात मोठा गहजब निर्माण झालाय. एकीकडे त्यांची हत्या झाल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरदार सुरुय. महत्वाची बाब म्हणजे बलुचिस्तान सरकारच्या एका अधिकृत ट्विटर हँडलवरच तसा दावा करण्यात आला आणि एकच खळबळ उडाली. एकेकाळी लष्कराच्या पाठिंब्याच्या जोरावर निवडून आल्याची टिका सहन केलेले इम्रान खान लष्कराशी बिनसल्यामुळेच तुरुंगात गेले असं म्हटलं जातं आणि यात सर्वाधिक मोठा हात आहे तो पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असिम मुनीर यांचा. एकेकाळी मित्र आणि आता कट्टर शत्रू असे या दोघांचे संबंध आहेत. पाकिस्तान सरकारचा इम्रान खान यांच्याविरोधातली भूमिका ही मुनीर यांचीच भूमिका असल्याचीही चर्चा आहे. त्यातच इम्रान यांना त्यांच्या कुटुंबीयांना भेटू दिलं जात नसल्यानं त्यांच्या हत्येची चर्चा जोर पकडतेय. काय घडतंय पाकिस्तानमध्ये पाहूया एक रिपोर्ट.....