उद्धव ठाकरे आज पुन्हा राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर गेले... दोन भावांमध्ये जवळपास तास-दीड तास चर्चा झाली.गेल्या काही दिवसांत शिवसेना आणि मनसे नेत्यांच्या एकमेकांशी भेटी झाल्या.मात्र या बैठकांमध्ये काही मुद्द्यांवर पेच निर्माण झाला.हा पेच सोडवण्यासाठीच आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे भेटल्याचं समजतंय. या दोघांमध्ये जागावाटपावर चर्चा झाल्याचं समजतंय.पाहुया ठाकरे बंधूंच्या भेटीचा आजचा अजेंडा काय होता.