Nagpur| तिघांचा खोडसाळपणा, रस्त्याकडेला असलेल्या व्यक्तीला मारली लाथ; लगेचच मिळाले कर्माचे फळ

नागपूरातील इमामवाडा पोलीस स्टेशन हद्दीतील चंदन नगर परिसरात धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार रमेश मोथे हे आपल्या घराबाहेर रस्त्यावर उभे असताना भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीवरून तीन अज्ञात युवकांनी त्यांच्यावर हल्ला केला.दुचाकीवरील एका युवकाने रमेश यांना अचानक लाथ मारत ढकलले ज्यामुळे ते खाली कोसळले.पुढे काही अंतरावरच दुचाकीचा तोल जाऊन तिघेही खाली पडले मात्र उठताच ते घटनास्थळावरून फरार झाले. या प्रकारामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांमध्ये संताप पसरला आहे.वाढत्या असामाजिक कारवायांमुळे वरिष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थी यांना घराबाहेर पडणेही धोकादायक होत आहे अशी भावना स्थानिकांमध्ये व्यक्त होत आहे.नागरिकांनी पोलिस प्रशासनाने गस्त वाढवावी आणि संबंधित आरोपींना तातडीने अटक करावी अशी मागणी केली आहे....

संबंधित व्हिडीओ