अकोल्यातील तारफाईल परिसरात पतीने पत्नीसह 3 वर्षाच्या चिमुकलीची हत्या केल्याची घटना घडली.शनिवारी दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला.सुरज गणवीर असं पतीचं नाव असून सतत होणाऱ्या वादाला कंटाळून त्याने हत्या केल्याचं समोर आलंय.मयत पत्नी अश्विनी ही आरोपीची दुसरी पत्नी असून पहिल्या पत्नीपासूनही त्याला एक मुलगी आहे. या दोघींच्या हत्येनंतर तो पहिल्या पत्नीच्या मुलीलाही मारण्यासाठी गेला.मात्र नातेवाईक मध्ये पडल्यानं मुलीचा जीव बचावलाय. दरम्यान पोलिसांनी आरोपीला पकडल्यानंतर पोलीस ठाण्यात आरोपीला चोप देण्यासाठी गर्दी झाली होती.मात्र दंगा नियंत्रण पथक बोलावून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.