#Manchar #Pune #Dargah पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचर शहरात एका दर्ग्याभोवती वाद निर्माण झाला आहे. दर्ग्याची भिंत कोसळल्यानंतर त्याखाली भुयार आणि मंदिरासारखी रचना असल्याच्या चर्चांनी या वादाला तोंड फुटले आहे. यामुळे स्थानिक लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या असून या ठिकाणी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची सत्यता आणि स्थानिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी या जागेला भेट देऊन प्रत्यक्ष आढावा घेतला आहे.