#KarulGhat #Vaibhavwadi #Landslide वैभववाडी-करूळ घाटातील धोकादायक दरडी काढण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. ४ सप्टेंबर रोजी दरड कोसळल्याने बंद झालेला हा घाट शनिवार, १३ सप्टेंबरपासून वाहतुकीसाठी पुन्हा सुरू होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, सर्व धोकादायक भाग काढण्यात आल्याने आता प्रवास सुरक्षित झाला आहे. या कामामुळे अनेक दिवसांपासून खोळंबलेली वाहतूक पूर्ववत होणार असून प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.