सोलापूरच्या कुर्डू गावातील अवैध वाळू उपशाच्या प्रकरणी महिला पोलीस अधिकाऱ्याला फोनवरून दमदाटी केल्याच्या आरोपांवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अखेर मौन सोडले आहे. या प्रकरणावर चौफेर टीका झाल्यानंतर पहिल्यांदाच माध्यमांसमोर येत, ‘मला जे सांगायचं आहे ते मी ट्विट करून सांगितलं आहे, आता मला यावर काही बोलायचं नाही’ असे त्यांनी स्पष्ट केले.