#HighwayAccident #MumbaiAhmedabadHighway #TruckAccident मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणूजवळ एक भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगातील मालवाहू ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुलाच्या कठड्याला धडकून ३० फूट खोल नदीत कोसळला. या अपघातात ट्रकचा अक्षरशः चक्काचूर झाला असून चालक गंभीर जखमी झाला आहे. जखमी चालकाला तात्काळ कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे महामार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती.