मुंब्रा येथील ब्लिंकिटच्या गोदामात मांसाहारावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. ग्राहकांनी ऑर्डर केलेल्या मांसात डुकराचे मांस (पॉर्क) आढळल्याने संतप्त जमावाने गोदामाची तोडफोड केली. मांसात भेसळ झाल्याचा संशय व्यक्त करत जोरदार निदर्शने करण्यात आली. पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली असून, पुढील चौकशी सुरू आहे.