अमरावती जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि काँग्रेसच्या हालचालींना वेग आला आहे. विधानसभा निवडणुकीत मिळालेले यश जिल्हा परिषदेतही कायम ठेवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. तर, दुसरीकडे काँग्रेसला आपली 'मरगळ' झटकून जिल्हा परिषदेवरची सत्ता अबाधित राखायची आहे. दोन्ही पक्षाचे दिग्गज नेते या महत्त्वाच्या स्थानिक निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत. अमरावतीमधील जिल्हा परिषदेचे राजकारण, दोन्ही पक्षांची बलस्थाने आणि रणनीती यांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी पाहा हा रिपोर्ट.