विमानात मराठी भाषेच्या वापरावरून झालेल्या वादानंतर, पीडित महिलेने मनसे नेते अविनाश जाधव यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. युट्यूबरसोबतचा हा वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, आपल्याला धमकीचे फोन येत असल्याचं महिलेने सांगितलं आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी या वादात मध्यस्थी करत संबंधित युट्यूबरला जाहीर माफी मागायला लावणार असल्याचे आश्वासन महिलेला दिले आहे.