मनसेचे नेते राजू पाटील यांनी कल्याण ग्रामीण मतदारसंघात बोगस मतदारांचा गंभीर आरोप केला आहे. मतदार यादीत १६ हजार ७९८ बोगस मतदार असून, एकाच व्यक्तीचे नाव पाच-पाच ठिकाणी असल्याचा दावा राजू पाटलांनी केला आहे. मतदार याद्यांमध्ये घोळ करून हे लोक सत्तेवर आले, असे पाटील यांचे म्हणणे आहे. याचसोबत त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सणसणीत टीका केली आहे.