बिहार निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असताना, वक्फ विधेयक वादाच्या केंद्रस्थानी आले आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी महाआघाडीचे सरकार आल्यास हे 'वक्फ विधेयक' रद्द करण्याची घोषणा केली आहे, ज्यामुळे मोठा राजकीय गदारोळ सुरू झाला आहे. संसदेने पारित केलेला हा कायदा राज्यात लागू होऊ देणार नाही, असे तेजस्वी यादव यांनी स्पष्ट केले आहे. एका बाजूला भाजप या कायद्याचे समर्थन करत असताना, तर दुसऱ्या बाजूला तेजस्वी यादव या विधेयकाला 'असंवैधानिक' ठरवत आहेत. वक्फ विधेयक म्हणजे काय? आणि एका राज्याचा मुख्यमंत्री केंद्र सरकारने पारित केलेला कायदा खरोखरच रद्द करू शकतो का? या संपूर्ण राजकीय संघर्षावर पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट.