उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर आहेत.केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आला असून, शिवसेनेला एक कॅबिनेट मंत्री आणि एक राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.सूत्रांच्या माहितीनुसार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना कॅबिनेट मंत्रीपदाची संधी मिळू शकते. तर दुसरीकडे राज्यमंत्रीपदासाठी नव्याने निवडून आलेल्या सहा खासदारांमध्ये चुरस पाहायला मिळत आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर असून त्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत भेट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे..