या निर्णयामुळे बीडच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत हेमंत क्षीरसागर संदीप क्षीरसागर यांच्याविरोधात लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. बीड मतदारसंघातील क्षीरसागर कुटुंबातील ही राजकीय लढाई लक्षवेधी ठरणार आहे.