दिल्ली स्फोटात जखमी झालेल्या नागरिकांची विचारपूस करण्यासाठी गृहमंत्री अमित शाह यांनी रुग्णालयात भेट दिली. त्यांनी जखमींना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. यासोबतच, त्यांनी उच्च सुरक्षा अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तपासाचा आढावा घेतला आणि या दहशतवादी कृत्यामागील दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले.