राज्यात शिवसेना-राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आणि मराठा-ओबीसी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या आगामी निवडणुकांसाठी शरद पवार यांनी अत्यंत महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. 'मूळ ओबीसींना दुखवू नका' हा पवारांच्या संदेशाचा मुख्य गाभा आहे. निवडणुकीत सामाजिक समतोल राखण्यासाठी आणि ओबीसी समाजाला सोबत घेण्यासाठी ही रणनीती महत्त्वाची ठरणार आहे.