देशाची राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ एका कारमध्ये मोठा स्फोट झाल्याने खळबळ उडाली. मेट्रो स्टेशनजवळ सायंकाळी ही घटना घडली. स्फोटामुळे काही जण जखमी झाले आहेत. सुरक्षा यंत्रणा आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.