: बीड जिल्ह्यात परतीच्या पावसाने हाहाकार माजवला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा अक्षरशः चिखल झालाय. केज तालुक्यातील पिंपळगव्हाण गावातील गायकवाड कुटुंबानं पारंपारिक पिकांना वगळून एक एकर शेतामध्ये टोमॅटो या नगदी पिकाची लागवड केली होती. कष्ट, मेहनत, आशा सगळं काही पणाला लावलं. काढणीच्या उंबरठ्यावर उभं असलेलं हे टोमॅटोच पीक परतीच्या पावसाने अक्षरशः चिखलात गाडलं गेलं. हातबल झालेल्या या शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू आहेत. ओठांवर फक्त एक हाक आहे. मायबाप सरकार, आम्हाला वाचवा आम्हाला मदत करा अशी आर्तहाक शेतकरी देत आहेत.. याच शेतकऱ्यांची बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी आकाश सावंत यांनी....