पंढरपूरची भीमा नदी दुथडी भरून वाहतेय! उजनी धरणातून सुमारे एक लाख क्यूसेक पाण्याचा विसर्ग सोडल्यामुळे पंढरपूरच्या भीमा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. सध्या भीमा नदी एक लाख क्यूसेक क्षमतेने वाहत आहे. गेल्या चार महिन्यांत सातव्यांदा भीमा नदीने मोठी पाणी पातळी गाठलेली दिसून येते. नागरिकांनी नदी किनारी जाणे टाळावे.